You are currently viewing मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply – Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra , mukhyamantri ladli behna yojana maharashtra 2024.

महाराष्ट्र “Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024” योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत..

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply” योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online apply योजनेचा उद्देश :-

  • (१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • (२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • (३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • (४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  • (५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Benefits

थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Eligibility

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Disqualification

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Required document list

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).

(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

(७) रेशनकार्ड.

(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Selection process

लाभार्थी निवड :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana online apply process 2024

  • अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल App/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-
    • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
    • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
    • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) /सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
    • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
    • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड
  • तात्पुरत्या यादीचे प्रकाशन: अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/App जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.