You are currently viewing ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना मध्ये मोठे बदल: Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 eligibility
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना मध्ये मोठे बदल: Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 eligibility

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना मध्ये मोठे बदल: Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 eligibility

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना मध्ये मोठे बदल: Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 eligibility – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथिल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती दिली आहे. सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 eligibility changes

१) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ

‘Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती. ती 2 महिने करण्यात आली असून दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै, 2024 पासून दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२) अधिवास प्रमाणपत्र अट रद्द Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे-

  • 1. रेशन कार्ड
  • 2. मतदार ओळखपत्र
  • 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • 4. जन्म दाखला
  • या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.

३) Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana या योजनेतून शेतीची अट रद्द

या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. अगोदर हि अट ठेवण्यात आली होती आता शेतीची अट काढण्यात आली आहे.

४) वयाची अट वाढली आहे

या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५) परराज्यात जन्म झालेल्या महिलांसाठी

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

६) उत्पन्न दाखला बद्दल Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana income certificate

रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.

७) अविवाहित महिलांसाठी अर्ज करता येणार- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.